अवैध 5 दारू अड्ड्यांवर छापे घालून 1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त 1.86 lakh items seized in raids on 5 illegal liquor dens

Share This News

तिरोडा,दि.17 : येणाऱ्या होळीच्या सणाच्या वेळी शांतता राहावी, यासाठी तिरोडा पोलिसांनी आजपासून विशेष मोहीम सुरु केलेली आहे. त्या अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज बुधवार, 17 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वाजतादरम्यान 5 अवैध दारू अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून 1 लाख 86 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांच्यावर झाली कारवाई

  • (1) कविता सेवकराम तांडेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 18 प्लास्टिक चुंगडीत 360 किलो सडवा मोहफूल किंमत 28 हजार 800 रुपये असा माल मिळून आला.
  • (2) शीला विनोद खरोले रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 22 प्लास्टिक चुंगडीत 440 किलो सडवा मोहफूल किंमत 35 हजार 200 रुपये असा माल मिळून आलेला आहे.
  • (3) साबीर रहीम खा पठाण रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी रनिंग मोहफूल दारू काढण्याची सुरु असलेली भट्टी, 10 लिटर मोहफुलांची दारू, 4 प्लास्टिक चुंगडीत 80 किलो सडवा मोहफूल, दारू काढण्याचे साहित्य असा एकूण 8 हजार 650 रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • (4) पूर्णा प्रल्हाद तांडेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 15 प्लास्टिक चुंगडीत 300 किलो सडवा मोहफूल किंमत 24 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • (5) धीरज प्रकाश बरियेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरझडतीत 56 प्लास्टिक चुंगडीत 1120 किलो सडवा मोहफूल किंमत 89 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.

असा एकूण 1 लाख 86 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर धीरज प्रकाश बरियेकर हा आपल्या दारूच्या अड्यावर मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, नाईक पोलीस शिपाई बर्वे, श्रीरामे, पोलीस शिपाई रवी रामटेके, महिला पोलीस शिपाई भूमेश्वरी तीरिले, नंदा बडवाईक यांनी केलेली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.