शंभर रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार 100 rupees old note will be band

Share This News

नवी दिल्ली, 22 जानेवारी : आगामी मार्च महिन्यापासून 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्याऐवजी यापूर्वीच चलनात आलेल्या 100 च्या नव्या नोटा वापरल्या जातील अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक बीएम महेश यांनी दिली. जिल्हा पंचायत नेत्रावती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकिंग सुरक्षा व रोख व्यवस्थापन बैठकीत त्यांनी संबोधीत केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बीएम महेश म्हणाले की, सध्या चलनात असलेल्या 100 च्या बहुतेक नोटा बनावट असल्याने जुन्या 100 रुपयांच्या नोटा मागे घेण्यात येतील. गेल्या 6 महिन्यांपासून आरबीआय त्यांचे मुद्रण करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय फक्त नवीन नोटा चलनात आणण्यासाठी घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.भारतीय रिझर्व्ह बँकने दोन वर्षांपूर्वी 100 रुपयांची नवी नोट चलनात आणली होती. ही नोट चलनात आल्यानंतरही आधीच्या 100 रुपयाच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकने स्पष्ट केले होते. ही नवी नोट फिक्कट जांभळ्या रंगाची आहे. नोटेमध्ये अशोक स्तंभ तर नोटेच्या मागील बाजूस राणीच्या विहिरीचे चित्र आहे. यासोबतच 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा देखील चलनातून बाद करण्याचा आरबीआयचा मानस आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.