३९ हजार मतदार ठरविणार ११२ ग्रामपंचायत सदस्य

Share This News

सावनेर
राज्य निवडणूक आयोगाने नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्या अनुशंगाने सावनेर तालुक्यात एकूण १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. १२ ग्रामपंचायत अंतर्गत येणारे एकूण ३९ हजार ५0७ मतदार ११२ ग्रामपंचायत सदस्यांचे भाग्य ठरविणार आहेत. बुधवार, २३ डिसेंबरपासून तालुका कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात झाली आहे. सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात होत असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नैसर्गिक आपत्ती व कोरोना महामारीमुळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, कोरोनाचे सावट सुरू असतानाही डिसेंबर २0२0 पर्यंत मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ डिसेंबरला जाहिर करण्यात आल्या.
सावनेर तालुक्यातील गडमी, जैतपूर, जटामखोरा, नरसाळा, पोटा, पाटणसावंगी, खुबाळा, खुसार्पार, टेंभुरडोह, सावंगी हेटी, सोनपूर, नांदोरी या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत आहे. २३ ते ३0 डिसेंबरपयर्ंत नामनिर्देशन पत्र भरणे, ३१ डिसेंबर नामनिर्देशन पत्राची छाननी, ४ जानेवारी २0२१ नामनिर्देशन पत्र मागे घेणे, १५ जानेवारी मतदान व १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. सावनेर तालुक्यात होणार्‍या एकूण १२ ग्रामपंचायत अंतर्गत ३९ हजार ५0७ असून, अनु जाती ७८५१ तर अनु जमातीमधील ५३0८ मतदार आहेत. १२ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ग्रामपंचायतनिहाय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, भारिप, राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसपी आदी पक्षात प्रमुख लढत होत असलेल्या अधिकतर ग्रामपंचायतवर केदार गटाची सत्ता आहे. १२ ग्रामपंचायतपैकी पोटा व पाटणसावंगी ग्रामपंचायत मोठय़ा आहेत. पाटणसावंगी ग्रामपंचायत येथे ११ हजार ३९८ तर पोटा ग्रामपंचायत येथे १३ हजार ८५१ मतदार आहेत.
पाटणसावंगी ना. सुनील केदार यांचे गृहगाव आहे. कोरोना काळातील तालुक्यात प्रथम निवडणूक असल्यामुळे एकमेकांना धूळ चारण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर करीत आहेत. नामनिर्देशनाच्या दिवसापासून आजपर्यंत एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नसल्याची माहीती नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी दिली. तालुक्यातील सदर ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण तयारी व होऊ घातलेल्या निवडणुका शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिली.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.