टिकैत समर्थक १२ कार्यकर्त्यांना यवतमाळात अटक

Share This News

यवतमाळ : शेतकरी नेते राकेश टिकैत यांची सभा कोरोनामुळे रद्द झाल्यानंतरही जबावबंदी आदेश झुगारत शनिवारी आझाद मैदानावर घोषणाबाजी करणाऱ्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायदाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केल्यानंतर टिकैत यांनी महाराष्ट्रातून किसान महापंचायत आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. मात्र कोरोनामुळे त्यांच्या यवतमाळातील सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतरही संयुक्त किसान मोर्चाचे गुरुनामसिंग, तेजिंदरसिंग यांच्यासह काही जण दिल्लीवरून आले. त्यांनी आझाद मैदानावर नारेबाजी केली. सभा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.