अमरावतीत 1200 जिलेटीन कांड्या जप्त;दहशतवाद विरोध पथकाची कारवाई

Share This News

अमरावती- शहरात गस्तीवर असलेल्या दहशतवाद विरोध पथकाने अमरावती लगतच्या नांदगाव पेळ जवळील वडगाव माहुरे मार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून जिलेटीनच्या 1200 कांड्या जप्त केल्या आहे. दोन जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. पंधरा दिवसापूर्वी 200 कांड्या तिवसा येथून जप्त करण्यात आल्या होत्या.
दहशतवाद विरोधी पथक सोमवारी सांयकाळी शहरात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना गोपनीय सुत्रांकडून पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीतील वडगाव माहुरे रोडवर एक चारचाकी वाहन संशयास्पद स्थितीत उभे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पथक तेथे पोहचले. त्यावेळी वाहना जवळ दोन इसम उभे होते. पथकातील सदस्यांनी वाहनाची तपासणी केली असता 6 पेट्यांमध्ये 1200 नग जिलेटीन कांड्या आढळून आल्या. त्या लगेच जप्त करण्यात आल्या. या कांड्या वाहनातून तेथे घेऊन आलेल्या कानसिंह गणपतसिंह राणावत ( वय 44 वर्षे रा. संगमेश्वर नगर नांदगाव पेठ) व सुरज भारतसिंह बैस (वय 31 वर्षे रा. गजानन नगर नांदगाव पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. कांड्या, चारचाकी वाहन व दोन मोबाईल असा एकूण 10 लाख 59 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जिलेटीन कांड्या कोणत्या उद्देशाने तेथे आणण्यात आल्या होत्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दोनही आरोपींवर नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. निलीमा आरज यांचे नेतृत्वात दहशतवाद विरोधी कक्ष येथील सहा. पोलिस निरीक्षक पंकजकुमार चके्र, दिपक श्रीवास, जमील अहेमद, अमर बघेल, मनोज मोकळे, अभिराज इंदूरकर यांनी केली. पुढील तपास नांदगाव पेठ पोलिस करीत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.