भारतात 24 तासात 12,689 नवे कोरोना रुग्ण 12,689 new corona patients in India in 24 hours
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर गेल्या 24 तासात भारतात 12,689 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 137 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 13,320 नवे नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 1,06,89,527 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,76,498 झाली आहे . एकूण 1,03,59,305 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,53,724 पोहचला आहे. आतापर्यंत देशात 20,29,480 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 5,50,426 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 19,36,13,120 चाचण्या घेण्यात आल्या.