इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय|13 Missile Attacks on US Troops in Iraq, Biden

Share This News

बगदाद : इरकमधील ऐन अल-असद एअरबेसवर बुधवारी (3 मार्च) 13 रॉकेटचे हल्ले झालेत. या हवाई छावणीवर अमेरिकेसह मित्र देशांचं आणि इराकचं सैन्य थांबलेलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मागील एका महिन्याच्या काळात झालेला हा दुसरा रॉकेट हल्ला आहे. है. विशेष म्हणजे 2 दिवसांनी पोप फ्रांसिस हे इराक दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमवर हा हल्ला झालाय .

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एअरबेसपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावरील एका लाँच पॅडवरुन हा हल्ला झाला. यात 13 रॉकेट्सचं डागल्याची माहिती बगदाद ऑपरेशन कमांडचे अधिकाऱ्यांनी दिलीय. हा एअरबेस इराकच्या पश्चिमेकडील अंबार प्रांतमध्ये आहे. दुसरीकडे पोप फ्रांसिस इराकचा दौरा करणार आहेत. इराकमधील सुरक्षा स्थिती कमालीची बिघडलेली असताना हा दौरा होत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. 3 वर्षांमध्ये पहिल्यांदा राजधानी बगदादमध्ये इतका मोठा आत्मघातकी हल्ला झालाय.

याआधीही अमेरिकी सैनिकांवर अनेक हवाई हल्ले, अनेकजण जखमी

16 फेब्रुवारी रोजी इराकमध्ये झालेल्या आणखी एका रॉकेट हल्ल्यात एका ठेकेदाराचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एक अमेरिकन सैनिकही जखमी झाला होता. रॉकेटच्या सहाय्याने बंडखोरांनी उत्तर इराकमधील एका एअरबेसला निशाण बनवलं. यानंतर अमेरिकेने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत मागील गुरुवारी सीरियात इराणचं समर्थन असलेल्या मिलिशिया समुहांच्या तळांना लक्ष्य करत हवाई हल्ले करण्यात आले.

बायडेन प्रशासनाची पहिलीच सैन्य कारवाई

अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात सीरियात झालेली ही पहिली सैन्य कारवाई आहे. बायडन प्रशासनाने मध्यपूर्वेकडील देशांपेक्षा चीनकडे अधिक लक्ष देण्याचं धोरण स्वीकारल्याचं बोललं जातंय. हा हल्ला म्हणजे युद्धातील उडी नसून केवळ संदेश होता. अमेरिकेचं सैन्य आपल्या आणि मित्र देशांच्या सैनिकांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे असाच संदेश यातून देण्यात आलाय, अशी माहिती पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.