१४ ग्रॅम ९ मिलीग्रॅम एमडी जप्त

Share This News

नागपूर : अंमली पदार्थविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम होंडा शाईन क्र. एमएच/४९/ एल. ८२७७ गाडीवर वैशालीनगर गार्डनजवळ एमडी ही ड्रग पावडर घेऊन विक्री करण्याकरिता येणार आहे. या माहितीवरून ८ एप्रिलला सकाळी पाचपावली हद्दीत वैशालीनगर गार्डनजवळील रोडवर सापळा रचण्यात आला. तेथून सुमेध भागवत लांडगे (३७) रा. वैशालीनगर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १४ ग्रॅम 0९ मिली ग्रॅम एमडी ड्रग (किं. १,३0,९00), १ मोबाईल, १ मोटर सायकल असा एकूण २ लाख ९00 रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.