भारतात 24 तासात 14,849 नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली, 24 जानेवारी
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर गेल्या 24 तासात भारतात 14,849 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 155 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 15,948 नवे नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 1,06,54,533 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,84,408 झाली आहे . एकूण 1,03,16,786 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,53,339 पोहचला आहे. आतापर्यंत देशात 15,82,201 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 7,81,752 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 19,17,66,871 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.