देशात १९,0७८ नवे कोरोना रुग्ण, २२४ मृत्यू 19,078 new corona patients, 224 deaths in the country

Share This News

नागपूर – ३८४ भंडारा – ४६
गडचिरोली – ११
चंद्रपूर – २२
यवतमाळ – ४२नागपुरात ३८४ नवे बाधित, ११ बळी
शनिवारला दिवसभरात नागपूर शहरात ४१३९ व ग्रामीण भागात ८६१ अशा एकूण पाच हजार चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी ७.७ टक्के म्हणजेच ३८४ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यामध्ये शहरातील ३४३, ग्रामीणमधील ३८ व इतर जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) च्या विषाणू प्रयोगशाळेतून ४८ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. शहरातून पाच व नागपूर ग्रामीण तसेच इतर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन अशा ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली.हिंदुस्थान समाचार/नवी दिल्ली
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात १९,0७८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २२४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २२,९२६ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे १,0३,0५,७८८ रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या २,५0,१८३ झाली आहे. एकूण ९९,0६,३८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,४९,२१८ पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतामध्ये दररोज जितक्या लोकांना कोरोनाची बाधा होते, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. हा कल सातत्याने कायम आहे. भारतामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २.५0 लाखांपयर्ंत खाली आली आहे. आज देशात २,५0,१८३ कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.५ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २.४३ टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये मिळून सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण देशातील रुग्णसंख्येच्या ६२टक्के आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.