इंग्लंडहून आलेल्या 20 प्रवाशांमध्ये आढळले नव्या स्ट्रेनचे संक्रमण

Share This News

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : इंग्लंडहून भारतात आलेल्या 20 प्रवाशांमध्ये आतापर्यंत करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेला आहे. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये आढळलेल्या 6 जणांचा समावेश आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेली आहे.  इंग्लंडमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. कोलकात्तामध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ज्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. जीनोम स्किवेंसिंगनंतर स्ट्रेन आढळला, मागील आठवड्यातच हा व्यक्ती यूकेवरून परतला होता. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे की, राज्यात जवळपास 7 लोकांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. यात तीन बंगळुरू व चौघे शिमोगामधील आहेत. तर, जे लोकं शिमोगामध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांच्या संपर्कातील काही जणांनादेखील करोना झालेला आहे.मागील काही दिवसांपासून ब्रिटनहून येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात आहे. जे लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळत आहेत, त्यांची जीनोम स्किवेंसिंग करून करोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशमधील मरेठ येथे दोन वर्षीय मुलीमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. मुलीचे कुटुंब ब्रिटनहून परतले होते. त्यानंतर मुलीसह तिचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर, नवा स्ट्रेन मात्र केवळ दोन वर्षीय मुलीतच आढळला होता. तर, बुधवारी बंगळुरु, पुणे आणि हैदराबादच्या प्रयोगशाळांमध्ये करोनाच्य नव्या स्ट्रेनची प्रकरणे समोर आली होती. ब्रिटनपासून सुरू झालेला करोनाचा हा नवा स्ट्रेन सध्या असलेल्या करोना व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक भयानक आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.