
मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर हे अखेर शिंदे गटात दाखल झाले आहेत. किर्तीकर यांच्या शिंदे गटात जाण्याविषयीची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरुच होती (MP Gajanan Kirtikar in Shinde Camp). काल मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटांच्या वतीने कीर्तीकर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून Uddhav Thackeray उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर हा ठाकरे गटात राहणार आहे. खासदार किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का असून गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.
किर्तीकर म्हणाले की, मी ठाकरे गटात प्रतीक्षा करत होतो. आम्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचा प्रवास हा शिवसेनेसाठी घातक आहे. यामुळे शिवसेनेचं भवितव्य धोक्यात आहे. या धोरणात बदल होईल, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. उद्धव ठाकरे हे चुकीच्या मार्गाने जात आहेत, असे किर्तीकर म्हणाले.
फरक पडत नाही- संजय राऊत Sanjay Raut
खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने आमच्या पक्षात थोडीशी सळसळही झालेली नाही. ते शिंदे गटात गेल्याने विशेष फरक पडत नाही. उद्या लोक त्यांना विसरून जातील, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिले नाही? किर्तीकर पाचवेळा आमदार राहिले, दोनवेळा मंत्रिमंडळात होते. दोनवेळा पक्षाने त्यांना खासदारकी दिली. त्यांचे पूत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटासोबत राहिले आहेत. त्यामुळे आमच्या गजानन किर्तीकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असे राऊत म्हणाले.

383 total views, 3 views today