
• नागपूर मेट्रो महिलांसाठी सुरक्षित, आरामदायक वाहतूक प्रणाली
नागपूर : विभागीय आयुक्त, नागपूर श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी काल मेट्रोने प्रवास केला.विभागीय आयुक्त यांनी सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन-लोकमान्य नगर- सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. यावेळी महा मेट्रोच्या वतीने त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती देण्यात आली. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प शहराकरिता माईल स्टोन असून नागरिकांनी याचा वापर करावा असे मत श्रीमती. बिदरी यांनी व्यक्त केले. नागपूर मेट्रोची सेवा नागपूरकांकरिता उपलब्ध असून हि पर्यावरणपुरक, सुरक्षित आणि स्वच्छ सेवा प्रदान करते असे त्या म्हणाल्या.
मेट्रोचा प्रवास सुखकर असून सर्वात सुरक्षित प्रवास असल्याचे आपल्याला जाणवल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन विभागीय आयुक्त यांनी नागपूरकरांना केले. मेट्रोचा उपयोग करून वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्यांना परवडण्यासारखे आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना फिडर सेवेच्या माध्यमाने पोहोचता येते. मेट्रोच्या रूपाने शहरात आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज उपलब्ध आहे. विविध देशात आपण मेट्रोने प्रवास केला असून नागपूरची मेट्रो सेवा त्या तोडीची असून हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
192 total views, 3 views today