
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल (Delhi HC on Shiv Sena Petition) केली होती. त्या याचिकेवर आज निर्णय झाला असून न्यायालयीने ती फेटाळून लावली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून त्याऐवजी दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे प्रदान केली आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव गोठवले होते. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली उच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत. त्यात न्यायालय हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलेच असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह प्रदान केले आहे. या दोन्ही गटांना वेगवेगळी नावेही देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. केंद्रीय निवडणूक आयोग पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कधी निकाल देणार यांसदर्भात स्पष्ट झालेलं नाही.
190 total views, 9 views today