
गोशाळा महासंघ महाराष्ट्र, नागपूर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आमदार श्री राजू भाऊ जी पारवे यांना महाराष्ट्रात गौ सेवा आयोग स्थापनेसाठी निवेदन देण्यात आले. राजू भाऊजी पारवे म्हणाले की, महाराष्ट्रातील गोसेवा आयोगासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्याशी बोलणार आहे. गोशाळांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवेदन देताना गौसेवा महासंघ नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप कश्यप, उमरेड पंचायत समिती सदस्य पुष्कर जी डांगरे, श्री प्रवीण कुलकर्णी, श्री कृष्णा गौ सेवा संस्था बुटीबोरीचे सचिव बब्बाजी निंबाळकर उपस्थित होते.
165 total views, 6 views today