
राज्यपाल आणि शिंदे गट निशाण्यावर : ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
बुलडाणा. राज्यातील सत्तांतरणानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विदर्भात येत ( Uddhav Thackeray in Vidarbha ) आहेत. बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शेतकरी मेळावा होणार (farmer gathering ) आहे. हा परिसर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून ओळखळा जातो. पण, शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी शिंदे गटात सहभागी होत ठाकर गटाला हादरा दिला आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांदा हा दोरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ठाकरे गटाने या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर भाष्य करणार याबाबतही चर्चा सुरू आहेत. राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी केलेलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिदे गट त्यांच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समर्थक आमदार-खासदारांसह कामाख्याच्या दर्शनासाठी गुवाहाटी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची संध्याकाळी सभा होणार आहे. विशेष म्हणजे बुलढाण्यातले दोन आमदार आणि एका खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विदर्भात आपला झेंडा कायम राखण्यासाठी ठाकरेंच्या याच दौऱ्याला विशेष महत्व आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर आहेत. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे यांच्याविरोधात आणि राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरे काय बोलणापर याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. या दौऱ्याबाबत कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनीही प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थेट जनतेत जाऊन त्यांची मते जाणून घेतली पाहिजे. पूर्वीच लोकांमध्ये गेले असते तर आज ही वेळ आली नसती, असे मत त्यांनी नोंदविला. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र सत्तार यांच्यावरच प्रतिहल्ला चढविला.
299 total views, 6 views today