
-हजारोंच्या उपस्थितीत बाबासाहेबांचा जयघोष, अस्थिकलशावर पुष्पवर्षाव
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात संविधान दिनी आज संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संविधान चौकात आज महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी होती. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर बाबासाहेबांच्या अस्थिकलशावर पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी ससाई यांच्या उपस्थितीत बुध्द वंदना घेण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून ससाईंनी मानवंदना स्वीकारली.
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा आणि त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला तसेच विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा अणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला.
या प्रसंगी स्मारक समितीचे सदस्य आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, प्राचार्या भुवनेश्वरी मेहरे तसेच भिक्खु संघाचे धम्म प्रकाश, धम्मबोधी, भीमा बोधी (जपान), थेराशिमा (जपान), नागसेन, भीमा बोधी, विनया शीला, अश्वजित, मिलिंद यांच्यासह भिक्खुनी संघप्रिया थेरी, नागकन्या थेरी, संघमित्रा थेरी, धम्म सुधा, किसा गौतमी, पुन्नीका, धम्मशीला, धम्मप्रीया, पद्मशीला, बोधी आर्या, श्रामनेरी आम्रपाली यांच्यासह उपासक उपासिका, समता सैनिक दल, एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी ससाई यांनी इंदोरा बुध्द विहार, संविधान चौक आणि नागपूर विमानतळावरील डॉ. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
*बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News*
234 total views, 3 views today