
मंत्री उदय सामंत यांचे ट्वीट
मुंबई. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये शिंदे गटावर टीकास्र सोडले. शिंदे गटातील बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून सातत्याने रेड्याची उपमा दिली जात आहे. गद्दार आणि खोकेही संबोधले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (political circles of Maharashtra ) यावरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) केलेल्या टीकेनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत(Minister Uday Samant) यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. एका खोचक ट्वीटद्वारे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार ‘वाघ’ होतो. आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही ‘रेडा’ झालो. किती ती चिडचिड? मी कुठंतरी वाचलंय ‘रेडा हे यमाचं वाहन आहे”, असं खोचक ट्वीट उदय सामंत यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात बोलताना शिंदे गटातील आमदारांचा ‘रेडे’ म्हणून उल्लेख केला होता. “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेले नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचे म्हटले होते. तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावे की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर शिंदे गटातील नेत्यांकडून उत्तर देण्याचा क्रम सुरू झाला आहे.
एकनाथ शिंदेंनीही दिले प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक टीका केली. “त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय. मला वाटत होतं की नैराश्य यायला त्यांना फार वेळ लागेल. पण ते आधीच आलं आहे”, असं एकनाथ शिंदे गुवाहाटी विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
301 total views, 3 views today