
नारायण राणेंचा बोचरा बाण : सुषमा अंधारेंवरही टीका
सिंधुदुर्ग. उद्धव ठाकरेंच्या (Shiv Sena chief Uddhav Thackeray) सोबत आता राहिलेय कोण? सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव (Sushma Andhare and Bhaskar Jadhav ) यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणले. तिथेच शिवसेना संपली. माझ्या विरोधात बोलायला शिवसेनेत कुणीच राहिले नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. यावेळी त्यांनी अंधारे यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनाही इशारा दिला. सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य सुटणार नाही, कारण त्या प्रकरणातले सगळे वास्तव आम्हाला माहिती आहे, अशी धमकीच राणेंनी आदित्य ठाकरेंना दिली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच कोकण दौऱ्यावर केला. या दौऱ्यात त्यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार आसूड ओढले. अंधारेंनी केलेले शाब्दिक वार राणेंच्या जिव्हारी लागले.
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून अंधारेंना प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चित्रा वाघ यावेळी उपस्थित होते. राणे म्हणाले की, माझ्यावर टीका करायला शिवसेनेत आता कोणी राहिले नाही, म्हणून तिला आणले आहे. शिवसेनेत उभी फूट पडतीये, याचा आनंद आहे. तिला माझ्यावर टीका करायला इथे आणले, याचा अर्थ शिवसेना संपली, असे राणे म्हणाले.
आदित्य ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की, शिवसेनेचे दुसरे पिल्लू आहे ते कुठल्याही बिळात शिरतेय. बिहारला जातो काय? कोणालाही मिठी मारतो काय. त्याने कितीही मिठ्या मारल्या तरी सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात तो सुटणार नाही. कारण आम्हाला वास्तव माहिती आहे. आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होती, काय केलं काँग्रेसने? आतापर्यंत किती भारत जोडला काँग्रेसने? एवढी यात्रा संपली की ते जातील इटलीला. अशा शब्दात राणेंनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली. शिवसेना नेत्यांवर बोचरे बाण सोडणाऱ्या राणेंना काय प्रत्युत्तर दिले जाते हेच आता बघावे लागेल.
490 total views, 3 views today