
नागपूर :योगगुरू बाबा रामदेव यांच्या महिलाविरोधी वक्तव्याविरोधात आम आदमी पार्टी महिला विंगतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
संयोजक कविता सिंगल यांच्या नेतृत्वात सदर रेसिडेन्सी रोड स्थित पतंजली फार्मसी समोर झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, दक्षिण नागपूर महिला संयोजक मेघा वाकोडे, पश्चिम नागपूर महिला संयोजक अलका पोपटकर, दक्षिण पश्चिम महिला उपाध्यक्ष पुष्पा डाबरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आम आदमी पार्टी नागपूर महिला विंगतर्फे सदर पोलीस स्टेशन मध्ये रामदेव बाबा यांच्या विरोधात आयपीसी कलम ३५४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार देखील करण्यात आली. यावेळी रोशन डोंगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, पीयूष आकरे, प्रभात अग्रवाल, प्रदीप पौनीकर, अमेय नारनवरे, नरेश महाजन, अब्दुल सलाम, विशाल वैद्य, शुभम मोरे, सौरभ दुबे, मानसिंग अहिरवार, किशन नीमजे, नासिर शेख, वंदना निमजे, नीलिमा नारनावरे, शुभांगी वळेकर हरीश वळेकर संजय बारापात्रे, प्रतीक्षा गौर, संजय गौर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
193 total views, 6 views today