
पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख व माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनी तुरुंगात राहून चक्क ३४ किलो वजन कमी केले आहे. सिद्धूचे सध्याचे वजन ९९ किलो असून, त्याने वजन कमी करण्यासाठी योगा, ध्यान आणि व्यायाम करण्यावर विशेष भर दिला आहे.त्यांच्या एका सहकाऱ्याने हा दावा केला आहे. 1988 च्या एका प्रकरणात नवज्योतिंसिग सिद्धू हे तुरुंगात शिक्षा भोगत आहे. हे गेल्या सहा महिन्यांपासून ते पतियाळा जेलमध्ये शिक्षा (Navjot Singh Sidhu) भोगत आहे. सध्या तुरुंगात सिद्धूची नियुक्ती “मुन्शी” म्हणून करण्यात आली आहे. जेल मॅन्युअलनुसार कैद्यांची अकुशल, अर्धकुशल आणि कुशल अशी वर्गवारी करण्यात येते. अकुशल आणि अर्धकुशल कैद्यांना अनुक्रमे ४० आणि ५० रुपये प्रतिदिन मिळतात. तर, कुशल कैद्यांना दिवसाला ६० रुपये मिळतात. नवज्योतसिंग सिद्धू त्याच्या फिटनेससाठीदेखील नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता नवज्योतसिंग सिद्धू एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
नवज्योतसिंग सिद्धु यांचे वजन ९९ किलो असून, त्यांनी वजन कमी करण्यासाठी योगा, ध्यान आणि व्यायाम करण्यावर विशेष भर दिला आहे. ते तुरुंगात किमान चार तास ध्यान, दोन तास योगा आणि व्यायाम करण्यावर भर देतात. इतरवेळी ते वाचन आणि केवळ चार तासांची झोप घेतात, असा दावा त्यांचे सहकारी नवतेजसिंग चीमा यांनी केला आहे. चिमा यांनी नुकतीच सिद्धूची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे. सिद्धू गत मे महिन्यापासून तुरुंगात बंदिस्त आहेत. त्यांची 6 महिन्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे. मे 2023 मध्ये त्यांची वर्षभराची शिक्षा पूर्ण होईल. त्यानुसार, ते पुडील 6 महिन्यांत तुरुंगाबाहेर येतील.
112 total views, 3 views today