
ग्रामस्थांसोबत साधला संवाद : चर्चेदरम्यान पानावले डोळे
चिखलदरा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) अमरावती जिल्ह्याच्या (Amravati district) दौऱ्यावर आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार ते जात असताना चिखलदरा तालुक्यातील बिहाली गावात (Bihali village of Chikhaldara taluk ) आपला ताफा अचानक थांबविला. थेट झोपडीत शिरून ग्रामस्थांसोबत संवाद साधला (Interacted with villagers). प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे, आदिवासींच्या आरोग्यासंदर्भात काय अडचणी आहेत, यावर त्यांनी महिला व नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतल्या. चंद्रमोळी झोपडीत शिरल्यावर तिथली अवस्था बघून आरोग्यमंत्र्यांचे डोळे पाणावले. मेळघाटातील कुपोषण, त्यामुळे होणारे बालमृत्यू, कागदपत्रे असलेली आकडेवारी या सर्वांपलीकडे जाऊन आपणास सोबतच काम करायचे आहे. आरोग्य सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. डॉक्टर हा रुग्णासाठी देव असतो. समन्वयाने या सर्व बाबींचा विचार करीत मातामृत्यू, बालमृत्यू यावर नियंत्रण मिळवायचे आहे. एका रात्रीतून हे घडणार नसले तरी प्रयत्नातून विश्वास आणि त्यातून आत्मविश्वास मिळेल. सर्वांनी मिळून काम करावे
, परंतु कामात हयगय चालणार नाही, असा सज्जड दम आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी मेळघाटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला.
मेळघाटच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक अंबाडेकर, उपसंचालक तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्याची चर्चा होत आहे.
मेळघाटात आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सामान्य माणसाप्रमाणे वाटेल तेथे थांबून माहिती घेतली. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात अग्निशमन यंत्र चालू आहे का, याची प्रात्यक्षिक करून पाहणी केली. तेथे उभे असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये थेट जाऊन बसले. चालकाशी संवाद साधून अर्धवट डिझेल आहे का, याची पाहणी केली. काही सूचनाही केल्या. चिमुकल्याला डोस पाजला. ताफा पुढे निघाला तोच काही विद्यार्थी बोरी गावासाठी जायला रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना स्वतःच्या गाडीत बसवून त्यांनी घरापर्यंत सोडून दिले.
चिमुकल्यांसोबतही रमले आरोग्यमंत्री
आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेत असताना अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यांजवळ मंत्री सावंत आपुलकीने गेले. गोड खाऊ म्हणून त्यांनी चॉकलेटचे वाटप केले व बालकांना कडेवरही घेतले.
297 total views, 3 views today