
नागपूरः ‘यशदा’च्या धर्तीवर नागपुरात ‘महारूद्र’ हे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार (Maharudra Training Center in Nagpur) असून या केंद्रात राज्यातील १ लाख ९२ हजार सरपंच तसेच ग्राम विकासाची कामे करणारे अधिकारी व कर्मचारी अशा तीन लाख लोकांना प्रशिक्षण देण्याची सोय राहील, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली. या प्रशिक्षण केंद्रासाठी १०० एकर जागेचा शोध घेण्याच्या सूचना नागपूरच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असून केंद्रात केंद्रात प्रत्यक्ष व स्क्रीनद्वारे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थीच्या निवासासाठी आमदार निवासाची व्यवस्था अपग्रेड केली जाणार आहे. हा ग्रामविकास खात्याचा प्रकल्प असून त्यात सांस्कृतिक कार्य विभाग नोडल एजन्सी म्हणून हा प्रकल्प साकारेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
चंद्रपूर येथे एसएनडीटीचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी ५५ कोटी रुपायंची तरतूद करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा
गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल व फॉरेस्ट युनिव्हर्सीटीचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाला कायदा करावा लागणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात किंवा मार्च अधिवेशनात हा कायदा मंजूर केला जाणार असून ट्रायबल विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने या विद्यापीठाला केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाचा तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
157 total views, 3 views today