
भाजप १५४, काँग्रेस २० जागांवर आघाडीवर
अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप अभूतपूर्व विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गुजरातमधील १८२ जागांपैकी भाजप तब्बल १५४ जागांवर आघाडी घेऊन असून हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपची विक्रमी विजयासह पुन्हा एकदा सत्तेकडे वाटचाल सुरु आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची पार दाणादाण उडाली असून सध्या हा (Big blow for Congress in Gujarat) पक्ष केवळ २० जागांवर आघाडी घेऊन आहे. तर गुजरातमध्ये मोठाले दावे करणाऱ्या केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला फारसे काहीही साध्य करता आलेले नसून हा पक्ष जेमतेम ६ जागांवर आघाडी घेऊन असल्याचे राजकीय चित्र दुपारी बारा वाजता दिसून आले आहे. चार जागांवर इतर पक्ष व अपक्ष उमेदवार आघाडी घेऊन आहेत. (Record Victory for BJP in Gujarat) गुजरात निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अपेक्षेप्रमाणे भाजप विजय ठरत असला तरी सध्याची स्थिती भाजपची विक्रमी विजयाकडे वाटचाल अधोरेखित करणारी आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा मिळाल्या होत्या. आकडेवारीनुसार यावेळी भाजपला किमान ५० जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं २०१७ मध्ये विधानसभेच्या ७७ जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ २० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला किमान ५५ जागांचे नुकसान होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे. मोठाले दावे करून गुजरातमध्ये सर्व जागा लढविणाऱ्या आम आदमी पक्षाला फारसे काहीही साध्य करता आलेली नाही. हा पक्ष जेमतेम ६ जागांवर आघाडी घेऊन आहे.
भाजपचा विक्रम
गुजरातमध्ये मागील 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असे दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपने 127 जागा घेऊन बहुमताचा आकडा पार केला होता. तर, यावेळी हा आकडा 150 च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
‘आप’चा काँग्रेसला फटका, भाजपला फायदा?
आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढविल्या होत्या. आपचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला 13 टक्क्यांहून अधिक मते मिळाली असून काँग्रेसचा मतदार ओढण्यात काही प्रमाणात आपला यश आल्याचे दिसत आहे. तसेच, काँग्रेसला आतापर्यंत 26.5 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसची मते ‘आप’कडे वळली असून त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे मानले जात आहे.
Ep.50 ईरानी मावा केक आणि रसमलाई फज
438 total views, 3 views today