
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: लव्ह जिहादच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यात काय कायदे केले आहेत त्याचा अभ्यास केला जात आहे. मात्र, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावरून लवकरच नवा कायदा येऊ शकतो . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 11 डिसेंबर रोजीचा नागपूर दौरा ऐतिहासिक व्हावा या दृष्टीने भाजप कामाला लागली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी या उत्साहापुढे पूर्वतयारीवर कसलाही परिणाम जाणवत नाही. रात्रंदिवस कामे सुरू आहेत 6708 कोटींचा मेट्रो फेस टू आणि 1900 कोटींचा नाग नदी पुनरुजीवन प्रकल्प असे दोन मोठे प्रोजेक्टना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नागपूरला ही मोठी भेट मिळाल्याकडे लक्ष वेधत फडणवीस यांनी 11 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
खरेतर 2019 झाली मान्यतेसाठी हे प्रकल्प आले. मात्र, काही त्रुटींमुळे महाविकास आघाडीच्या काळात रखडलेल्या दोन्ही प्रकल्पांना आमच्या सरकारने तातडीने पुढे नेले. गेल्या 25- 27 दिवसात हे दोन्ही प्रकल्प क्लिअर झाले यावरही त्यांनी भर दिला. या माध्यमातून निर्णयक्षमतेच्या बाबतीत विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला लक्ष्य केले. दरम्यान, सीमावाद प्रश्नी सर्वपक्षीय खासदार गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याकडे लक्ष वेधले असता महाराष्ट्राच्या हितासाठी ही चांगलीच गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
1,020 total views, 3 views today