
नागपूर: नागपूर शहरातील मेट्रोसेवेचा दुसरा टप्पा आणि शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या 1900 कोटींच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाला अखेर गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेले अनेक दिवस आग्रही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 11 डिसेंबरला या प्रकल्पाची घोषणा, भूमिपूजन करण्याची शक्यता बळावली आहे. महानगरपालिका हा नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1927 कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून 1115.22 कोटी, राज्य शासनाकडून 507.36 कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 131861 घरांना सीवर नेटवर्क मध्ये जोडण्यात येईल. नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे या प्रकल्पांतर्गत होणार आहेत.
प्रमुख मुद्दे
अंबाझरी तलावातून ही नाग नदी उगम पावते.
नाग नदीची एकूण लांबी ६८ किमी आहे.
शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे.
नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नवे ‘एसटीपी’ (९२ एमएलडी) तयार करण्यात येतील.
तर ‘एसटीपी’ (१० एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल.
नविन 4 पम्पींग स्टेशन.
प्रकल्पामध्ये १०७ ‘मॅनहोल’ वळण (मॅनहोल डायव्हर्सन)
४८.७८ किमी इंटरसेप्टर सीवर (नाग नदी व पिवळी नदी वर)
उत्तर झोन मध्ये 247.9 किमी सीवर लाईन तसेच मध्य झोन मध्ये 211.60 किमी सीवर लाईन बदलण्यात येतील.
प्रकल्प झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधरेल.
प्रकल्प वर्ष 5 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शहराचा स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल.
नदयांच्या पाण्यात प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल.
टॉर्टिला डे पटाटा आणि सी फूड सिजलर रेसिपी | Tortilla de Patatas & Seafood Sizzler Recipe | Epi 51
326 total views, 6 views today