
दोन्ही बाजुने वाहतूक सुरू ; नियम पाळा अन्यथा दंडाचा भुर्दंड
नागपूर. महाराष्ट्रात (Maharashtra ) भाजप-शिवसेनेचे सरकार (BJP-Shiv Sena government ) आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली होती. ती आज प्रत्यक्षात उतरली आहे. या महामार्गाचा ५२० किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तत्पूर्वी त्यांनी या मार्गाच्या एंट्री पॉइंटवर पाहणी करून १० किलोमीटर प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नागरिकांचीही या मार्गावरून प्रवासाची प्रतीक्षा संपली असून नागपूर व शिर्डी अशा दोन्ही बाजुने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला (Samriddhi Highway opened for traffic on both sides ) आहे. टोल पद्धती ऑनलाईन व सुटसुटित करण्यात आली आहे. तो वाहनचालकांच्या दृष्टीने हितावह असला तरी वाहनचालविताना नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. वेगमर्यादा ओलांडताच आपोआप खात्यातून दंडाची रक्कम वजा होईल. यामुळे या मार्गावरून बिनधास्त प्रवास करा पण मनाचा ब्रेक कायम असू द्या.
राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या महामार्गाबद्दत वाहनचालकांमध्ये प्रचंड आकर्षण पूर्वीपासूनच दिसून येत आहे. अनेकांनी उद्घाटनापूर्वीच या मार्गावरून प्रवासाची हौस भागवूनही घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकाच वाहनातून या मार्गावर राईड केली. आता हा मार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. लोकार्पण होताच दोन्ही बाजुने अनेक वाहने पुढच्या प्रवासाला रवाना झाली. वाहनचालकांनी मार्ग खुला झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
टोलची प्रक्रिया सुटसुटीत..
या मार्गावर जेवढा प्रवास केला तेवढाच टोल भरावा लागेल. शिर्डी ते औरंगाबाद प्रवास केल्यास तेवढाच टोल फास्टॅगमधून वजा होणार आहे. ठाणे ते नागपूर संपूर्ण महामार्ग जेव्हा सुरू होईल, तेव्हाही ठाण्याला टोल भरावा लागणार नाही, तर थेट नागपूरला पोहोचल्यावर फास्टॅगमधून टोलची रक्कम कापली जाणार आहे. यासंदर्भात नितीन गडकरी लोकसभेत म्हणाले होते की, महामार्ग बांधून सोडून देता येत नाही, तर त्याची वेळोवेळी देखभालही करावी लागते. त्यामुळे टोल नागरिकांना द्यावाच लागेल. या महामार्गावर वन्यप्राण्यांचीही सोय बघण्यात आली आहे. वाईल्डलाईफ ओव्हरपासही बनवलेले आहेत. सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यामुळे वेग आवाक्यात ठेवावा लागणार आहे. कारण वेगमर्यादा ओलांडली तर थेट १ हजार रुपये एका चालानचे द्यावे लागणार आहेत. नियम वारंवार मोडल्यास चालानची रक्कम वाढत जाते. तशा उपाययोजना सरकारने या महामार्गावर केल्या आहेत.
685 total views, 3 views today