
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अखेर तब्बल १३ महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राष्ट्रवादीसह अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील १० दिवस त्यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. विशेष म्हणजे तब्बल १३ महिन्यांनंतर त्यांना याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली की, अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली. न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांचे पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे, अशा अटी लागू केल्या. सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
1,297 total views, 3 views today