
नागपूर. कन्हान पोलिस स्टेशन (Kanhan Police Station ) हद्दीतील खाण क्रमांक सहा परिसरात (In mining area) रविवारी भरदुपारी 3.30 वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. जखमी झाला झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची (injured in firing MSF jawan dies during treatment) माहिती समोर येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (२९) रा. कॉलरी टेकडी व राहुल जेकब (२६) रा. कांद्री या दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी समीर व वेकोलिच्या इंदर कॉलनी परिसरात तैनात एका जवानाचा वाद झाला होता. त्यानंतर समीर हा या जवानाचा शोध घेत होता. रविवारी दुपारी मिलिंद हे परिसरात गस्त घालत होते. समीर व जेकब मोटारसायकलने या भागात संशयास्पदस्थितीत फिरताना मिलिंद यांना दिसले. मिलिंद यांनी त्यांना हटकले. दोघांनी मिलिंद यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला जाताच समीरने पिस्तुलातून मिलिंद यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. मिलिंद यांच्या डोक्यात दोन तर एक गोळी पोटात घुसली होती. घटनेपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून घेले होते. माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी मिलिंद यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कन्हान गाठून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर शिताफीने शोध घेऊन दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच मिलिंद यांचे सहकारी कामठीतील हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांनी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्येही तणाव निर्माण झाला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हॉस्पिटल परिसरातही पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. आज मात्र त्यांच्या मृत्यूचीच माहिती पुढे आली.

1,166 total views, 3 views today