
नागपूर : ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. संपूण्र निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या अशी मागणी करताहेत. वास्तविक पाहता त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसीसोबतही युती करतील, असे बावनकुळे म्हणाले.
‘मविआ’ला बोलण्याचा अधिकार नाही : बावनकुळे
नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या अशी मागणी करताहेत. वास्तविक पाहता त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भ-मराठवाड्याचा विकास होत आहे. त्याचा परिणाम आज ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येतोय. जवळपास साडे तीन ते चार हजार ग्राम पंचायती भाजप-शिंदे गट जिंकेल. सध्या टी-20 ची मॅच सुरू असून विरोधक बावचळले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसीसोबतही युती करतील, असे बावनकुळे म्हणाले.
831 total views, 6 views today