
नागपूर : भूंखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री हाय हाय.., मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, बिल्डर धारजीण्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
आज विधिमंडळाच्या दुसरा दिवस असून महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यालयातून विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. गांधी टोप्या घालून त्यावर बेळगाव निपाणी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा उल्लेख होता.
नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, ५० खोके एकदम ओके, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय.. च्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षआ गायकवाड, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, सुनील केदार, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, नितीन राऊत, अमोल मिटकरी, जयंत पाटील, राजेश टोपे आदि. नेते उपस्थित होते.
सुप्रसिद्ध नागपूरी तर्री पोहे चना स्पेशल |Nagpuri Tarri Pohe |Nagpuri style Tarri Poha Recipe| Epi57
406 total views, 3 views today