
नागपूरः नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडात घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले. एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांवर पलटवार केला. घोटाळ्याचे आरोप चुकीचे व अपुऱ्या माहितीवर आधारित असून हा एकनाथ शिंदे तुमच्यासारखे साडेतीनशे कोटी फुकट देत नाही, असा पलटवारही त्यांनी विरोधकांवर केला. विरोधकांनी या मुद्यावर आक्रमक होत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यानंतर मुख्यमंत्र्यांही स्वतःची बाजू मांडली व घोटाळ्याचे आरोप ठामपणे फेटाळून लावले.
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. एकनाथ शिंदे तुमच्या सारखे साडेतिनशे कोटी फुकट देत नाही तसेच धन दांडग्यांना पैसेही देत नाही. हा एकनाथ शिंदे कधीही खोटे काम करणार नाही. ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही, या शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
686 total views, 3 views today