
नागपूर ईपीएस 95 योजनेखाली मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनचा निषेध म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी मंगळवार, 27 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चाने धडकणार आहेत.
ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांच्या संयुक्त वतीने हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून दुपारी 1 वाजता निघेल.
पेन्शनवाढीसाठी महाराष्ट्र सरकारने केन्द्र सरकारवर दबाव आणावा, या मागणीचे निवेदन मोर्चातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
सेवानिवृत्तांनी या मोर्चात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीचे प्रकाश येंडे, प्रकाश पाठक, दादा झोडे, श्याम देशमुख, पत्रकार संघाचे शिरीष बोरकर, ज्येष्ठ महामंडळाचे अॅड. अविनाश तेलंग आदींनी केले आहे.
446 total views, 3 views today