
नागपूर : ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपाल यांनी महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. तसेच, घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. एका ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
विधिमंडळ अधिवेशनाचा आज ४ था दिवस एयु.. एयु कौन है? च्या मु्द्दयाने गाजतोय. सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे असून या प्रकरणाची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवित टीका केली. ते म्हणाले, लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या.. महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे.
235 total views, 3 views today