
मधुराः मथुरेत सध्या शाही ईदगाह मशिद असलेल्या स्थळाला हिंदु समाज श्रीकृष्ण जन्मभूमी मानतो. सतराव्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने या ठिकाणावरील कटरा केशव देव मंदिर पाडून त्या ठिकाणी शाही ईदगाह मशिद उभारल्याचा इतिहास सांगितला जातो. आता या मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने (Krishna Janmabhoomi case) दिले आहे. मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय देत मशिद परिसराच्या सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी कोर्ट कमिश्नरची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वात सर्वोक्षण होणार असून २० जानेवारीपर्यंत न्यायालयास अहवाल सादर करावा लागणार आहे.
हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता व उपाध्यक्ष सुरजीत यादव यांनी यासंदर्भात दिवाणी प्रकरण दाखल केले आहे. एकूण 13.37 कर जमिनीच्या मालकीचा वाद असून त्यात 10.9 एकर जमिन श्री कृष्ण जन्मस्थानजवळ आहे तर 2.5 एकर जमिन शाही ईदगाह मशिद व्यवस्थापनाकडे आहे. 1670 मुघल सम्राट औरंगजेबाने तत्कालीन केशवदेव मंदिर तोडून तेथे मशिद उभारण्याचे आदेश जारी केले होते. औरंगजेबाच्या शाही फर्मानचे पुरावे उपलब्ध आहेत. याच काळात काशी येथील विश्वेश्वर मंदिरही उध्वस्त करण्यात आले होते.
न्यायालयाने यापूर्वी या स्वरुपाची याचिका फेटाळली होती. त्यावेळी न्यायालयाने १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला दिला होता. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७मध्ये धर्मस्थळांची असलेली स्थिती आणि दर्जा कायम ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात हिंदू सेनाचे सदस्य विष्णू गुप्ता यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुरातत्व विभागाला २ जानेवारीपासून हे सर्वेक्षण करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल २० जानेवारीनंतर न्यायालयाकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
1,373 total views, 3 views today