
दोन्ही शावकांचा मृत्यू, सर्व प्रयत्न ठरले अपयशी
नागपूर. यापूर्वी तीन वेळी मातृत्वाची अनुभूती (feeling of motherhood ) आली. पण, तिन्ही वेळेला नियतीने डाव साधला. चौथ्यांदा डोहाळे लागल्यानंतर सारेच आनंदले. पण, दुर्दैवाने साथ सोडली नाही (Unfortunately, the support did not leave). नैसर्गिक प्रसुती झाली, दोन बछड्यांना जन्म दिला. पण, यावेळीही मातृसुख हिरावले गेले. ही व्यथा आहे, गोरेवाड्यातील ली वाघीणीची (Lee tigress in Gorewada). प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली गेली. पण, सारेच जागच्या जागी राहिले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे, अभिरक्षक दीपक सावंत, सहायक वनसंरक्षक सारिका खोत, सहायक वनसंरक्षक माडभूशी उपस्थित होते. अत्यावश्यक परिस्थिती हाताळाण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पशुवैद्यकिय विद्यापिठाचे प्रमूख आणि वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीश उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले होते.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहाळयातील ’ली’ वाघिणीला शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्या. यापूर्वी प्रसूतीनंतर लगेच शावकांना तोंडात दाबून मारण्याचा इतिहास लक्षात घेता पिल्लांना तातडीने वेगळे करून पिल्लांच्या कृत्रिम संगोपनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सारेजण लक्ष ठेवून होते. 8.25 वाजता पहिल्या पिलाला जन्म देण्यास सुरुवात केली. ते अर्धे बाहेर आले असताना लीने पिल्लाला तोंडाने बाहेर ओढले. शावकाच्या मानेजवळ जखम झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर अनेक तास प्रसव वेदना थांबल्या होत्या. याच काळात पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना केली गेली. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास पुन्हा प्रसव वेदना सुरू झाल्या. तिने दुसऱ्या पिल्लाला जन्मही दिला. ठरल्याप्रमाणे ‘ली’ला तातडीने पिलापासून वेगळे करण्यात आले. पण, ते मृत होते. आनंदाच्या सोहळ्यावर दुःखाची चादर पसरली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी अग्नी देऊन शव नष्ट करण्यात आले.
2009 पासून झाली नागपूरकर
2009 साली वाघिणीपासून दुरावलेले तीन बछडे महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले गेले. त्यांना ली, जान आणि चेरी अशी नावे दिली गेली. महाराजबागेतच साहेबराव वाघापासून ती पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. त्यानंतर ली आणि साहेबराव गोरेवाड्यात दाखल झाले. 3 फेब्रुवारी 2018 रोजी तिने चार बछड्यांना जन्म दिला. पण अनुभव नसल्याने चारही बछडे गमावले. त्यानंतर 31 मे 2022 ला तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर बछड्याची शेपूट पकडून गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला होता.
721 total views, 3 views today