
नागपूर. कर्नाटककडून सीमावादावर दररोज तीव्र स्वरूपाची मते मांडली जात आहेत. कर्नाटक विधानसभेमध्ये सीमावादाचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राने निर्माण केलेल्या वादाचा’ निषेध करणारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडलेला ठराव गुरुवारीच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र विधिमंडळात मात्र अपेक्षित असूनही फारशी चर्चा झाली नाही. कुणी नेते मंडळही तीव्र शब्दात बोलताना दिसत नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला.. राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याची टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुख्यमंत्री हजर नसल्याने ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली. त्यातच विरोधकांच्या गादारोळामुळे दुपारनंतर सभागृहाचे कामगाज तहकुब करण्यात आले. यामुळे मंगळवारी कर्नाटक प्रश्नावर विधानसभेत ठराव येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठरावा यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे असे सर्वांचे मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे, असे अजित पवार म्हणाले. पृख्वीराज चव्हाण यांनीही कर्नाटक सीमावादाचे प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटककडून भडक वक्तव्य करून राजकीय उद्देशाने संबंध चिघळविण्याचे प्रयत्न केले जात आसल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चाललेय की काय, अशी स्थिती आहे. मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना आपण बघ्याची भूमिका घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, यांनी या चर्चेला उत्तार देताना इंच-इंच जागेसाठी लढू हा शब्द सभागृहाला दिला. कुठल्याही स्थितीत मराठी मानसावर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. या वादासंदर्भात हे सरकार तसूभरही मागे राहणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मान खाली घालायला लावण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या चर्चेदरम्यान मराठी मनसांना अमानवीय वागणूक मिळत असल्याचा दावा केला. सीमा भागातील मराठी भावना काय ते कर्नाटक सरकारला दाखवून दिले पाहिजे. पण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड खाली टाकून बघात असल्याची टीका त्यांनी केली. फडणवीस यांनी या टीकेला जोरदार उत्तर दिले. आम्हाला मान खाली घालायला लावण्याची कुणाच्या बापाची हिंमत नसल्याचे ते म्हणाले.
1,056 total views, 3 views today