
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बुधवारी अजित पवार यांचा वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. त्यावर पवार यांनी बावनकुळे यांना टोला लगावला आहे. “हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये… मला तर आता राजकीय संन्यास घ्यावासा वाटतो” असा मिश्कील टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना लगावला.
तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात, मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात, भ्रष्टाचार, महिला सुसक्षा या विषयांचा समाविष्ट असेल.
अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. कुठल्या कालावधीत त्यांनी भ्रष्टाचार केला होता, उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क देणे गौण आहे. प्रकरण लक्षात आल्यानंतर ते सभागृहात मांडणे, हे विरोधकांचे कामच आहे, असे पवार म्हणाले.
Shankhnaad News | epesoid 64 ओट्स अँड रेझीन्स कुकीज आणि कोकोनट सागो पुडींग
594 total views, 3 views today