
नागपूर: जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा करीत विधान परिषदेच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात धरणे दिले.
विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी. त्रुट्या पूर्ण केलेल्या शाळांना वाढीव अनुदान द्यावे. केंद्रीय आश्रम शाळांचे प्रलंबित अनुदान ताबडतोब द्यावे, यासह अन्य मागण्या यावेळी आमदारांनी लावून धरल्या. या आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, अरूण लाड आदि सहभागी झाले होते.
1,180 total views, 3 views today