
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून दाखले दिले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. अविश्वास प्रस्ताव आम्ही नियमानुसारच आणला आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्काटदाबी केली. हे अधिवेशन पर्यटनासारखं झालयं. या सरकारकडे मंत्री नाहीत, दोन हजार लक्षवेधी मांडल्या असं सांगितलं जातयं. पण लक्षवेधींना उत्तरं देताना मंत्री नाहीत. गेल्या दोन अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात, त्याला काही आधार नाही. राज्यपाल भवनात नियमबाह्य काम सुरू आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना मांडले. त्याचे काही उत्तर नाही. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड सरकार असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.
1,555 total views, 3 views today