
“पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिरा बा यांच्या दुःखद निधनामुळे एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला आहे. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. आईचे निधन हे असहनिय असते. ‘काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से’, अशी त्यांची विचारधारा होती. प्रसिद्धीपासून नेहमी त्या दूर असायच्या. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी कठोर परिश्रम करून मुलांना वाढवून चांगले संस्कार दिले. त्यांच्या दुःखद निधनामुळे मोदी परिवारावर जो आघात झाला आहे, त्यातून सावरण्याची शक्ती नरेंद्रजी मोदी व परिवाराला ईश्वर प्रदान करो. मोदींच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे”, अशी शोक संवेदना माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
588 total views, 3 views today