
नागपूर :मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक देवस्थान मध्ये अनियमिततांची तक्रार राज्य शासनाकडे आली असून राज्य सरकार तर्फे एक महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल असे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदा सरवनकर यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास या मंदिरामध्ये लाखो भक्त दर्शनाला येत असताना दानपेटीतील पैशाचा योग्य तो विनियोग न करणे ,कोरोना काळात शासनाने भोजन स्थळे चालू करण्यासाठी दिलेल्या सूचनाची अंमलबजावणी न करणे, नियमाची तरतूद नसताना शासनाला पाच कोटी रुपयांची देणगी देणे, आगाऊ कर न भरण्याची सूट असतानाही शासनाला एक कोटी चाळीस लाख रुपयांचा आगाऊ कर भरणे, कोरोना काळात परराज्यातून 16,400 लिटर तूप मागविणे ,राज्यातील तूप विक्रेत्यांना डावलने, काही तूप फेकून देणे, उर्वरित तुपाची नियमात तरतूद नसताना निविदा मागवून विक्री करणे, मंदिर नूतनीकरणासाठी निविदा मागवणे यात न्यासाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोना काळात भाविकांच्या सोशल डिस्टन्सिंगचे कामासाठी 70 लाखाचे काम एका कंपनीला साडेतीन कोटी रुपयांना देणे अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात कोरोना काळात मंदिर बंद करण्यात आले होते मंदिर सुरू करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना करणे आवश्यक होते.शासनाकडे 22 डिसेंबर 2022 रोजी तक्रार प्राप्त झाली असून शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली
198 total views, 6 views today