
शिंदें गटाकडूनही शिवशक्ती – भीमशक्तीचा प्रयोग?
नागपूर. राज्यात भीमशक्ती – शिवशक्तीचा (Bhimshakti- Shivashakti ) प्रयोग पुन्हा अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरु आहेत. वंचित आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात युती होण्याची शक्यता आहे. या युतीद्वारे ठाकरेंकडून भाजप शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, याचवेळी शिंदे गटानेही आसाच प्रयोग करून ठाकरे गटाला प्रतीआव्हान देण्याची तयारी केली असल्याचे समोर येत आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा बाहेर येताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी शनिवारी (ता.31) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde ) त्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याभेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा अजेंडा व आमच्या पक्षाची भूमिकाही एकनाथ शिंदेंना सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्याला शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. युतीची घोषणा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घोषणा केली आहे. या चर्चेनुसार आगामी निवडणुकीतील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र लढणार आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कवाडे गट, दलित पँथर इतर आंबेडकरी चळवळींना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील राजकारण अत्यंत निसरडे असून पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार असल्याचे ते म्हणाले होते. ज्या काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली, त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप कवाडे यांनी केला होता.
586 total views, 3 views today