
तृणमूलच्या खासदारांनी व्यक्त केली नाराजी
नवी दिल्ली : एका विचित्र प्रवाशाकडून एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला (Drunk man urinates on woman co-passenger)होता. या प्रवाशावर एअर इंडियाकडून केवळ ३० दिवसांची बंदी घालण्यात आल्याने या कारवाईची सर्वत्र खिल्ली उडविली जात आहे. आता या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Trinamool Congress Mp) यांनी भाष्य केले असून. कॉमेडियन कुणाल कामरा याने विमानात पत्रकार अर्णव गोस्वामी याच्याशी वाद घातल्याने विमान कंपन्यांनी त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या दोन्ही घटनांची तुलना करून खासदार मोईत्रा यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका महिलेच्या अंगावर प्रवाशाने दारुच्या नशेत लघुशंका केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. न्यूयार्क ते दिल्ली या विमानाने महिला प्रवास करीत होती. त्यावेळी एका मद्यधुंद प्रवासी त्यांच्यापुढे आला व त्याने त्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. प्रवासी महिलेने टाटा ग्रुपचे चेअरमन एन, चंद्रशेखर यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली. यावेळी विमानातील स्टाफने काहीही केले नाही, अशी तक्रारही महिलेने केली आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने या घटना घटनेची चौकशी सुरु केल्याची माहिती आहे. मोईत्रा यांनी या कारवाईची तुलना कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर अनेक विमान कंपन्यांनी घातलेल्या सहा महिन्यांच्या बंदीशी केली आहे. या कारवाईवर मोईत्रा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मोईत्रा यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयालादेखील देखील टॅग करण्यात आलेय. कुणाल कामरा यांनी देखील या प्रकारावर ताशेरे ओढले आहेत.
341 total views, 3 views today