
नागपूर: लवकरच ५२१ एकर जमिनीवर मुंबईत जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी आपण करणार असल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे या फिल्म सिटीत नैसर्गिक स्पॅाट डेव्हलप करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.मुंबई विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम सुविधा, व्यवस्था विकसित करण्याचा विचार असून विमानतळाजवळ १०४ स्केअर किमीचा पार्क आहे, त्याला देखील पर्यटक आकर्षित होण्याच्या दृष्टीने विकासित करणार आहे. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी होणार की नाही याबद्दल माहित नसल्याचे सांगितले.दरम्यान, सध्या असलेली फिल्म सिटी इथेच राहणार आहे असेही त्यांनी नमूद केले. चित्रपट निर्माते इतर ठिकाणी जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी वन विंडो सिस्टीम आणली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात दिली. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना त्यांनीचित्रपट शुटिंगच्या परवानगीसाठी आता वन क्लिकवर सर्व एनओसी मिळणार असल्याची माहिती दिली
65 नवे पर्यटन स्थळ
राज्यात ६५ अनटच पर्यटन स्पॅाट विकसित करणार असून तिथे देखील शुटिंगची सोय करणार आहे. जेणेकरून कश्मिरला जाण्याची आपल्याल गरजच राहणार नाही असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, नागपुरातील विज्ञान परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या वादावर बोलताना पद्मश्री पोपरे यांचं भाषण थांबवल्याचे मला नाहित नाही. पण सरकारी कार्यक्रमात राजकीय बोलू नये, टीकात्मक सुर ठेऊ नये. धोरणात्मक बोलावे असा सबुरीचा सल्ला विरोधकाना दिला. खरेतर हळदी कुंकू ही आपल्या देशाची परंपरा आहे. जे विरोध करतात. त्यांनी आपल्या घरी हे करुन बघावं. तिथे कुणीही जबरदस्ती केली नाही असे सांगत समर्थन केले.
वाघाचे हल्ले यापूर्वीही झाले, तेव्हा आज विरोधात बोलणारे कुंभकर्णाची झोप घेत होते का. उपाय करायला काही कालावधी लागणार आहे. २४ तासांत सारे होणार नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडचा विरोध कशासाठी याकडे लक्ष वेधले असताआंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे.
1,242 total views, 6 views today