
बंगळुरूतून पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई. न्यूयॉर्कहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (Air India flight) महिलेवर लघुशंका करणाऱ्या विकृत व्यक्तीला अखेर अटक (Suspect on woman in plane arrested) करण्यात आली आहे. शंकर मिश्रा असे या विकृत आरोपीचे नाव आहे. त्याला बंगळुरू (Bangalore) येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी सतत त्याचे ठिकाण बदलत होता. मिश्रा एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष पदावर कामाला होता. या प्रकरणानंतर कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. पोलिसांनी आरोपी शंकर मिश्राच्या वडिलांनाही नोटीस दिली आहे. माझ्या मुलावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे ते सांगत आहेत. आरोपीचे वडील श्याम मित्रा म्हणाले की, माझ्या मुलावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. पीडितेने भरपाई मागितली होती, तीही आम्ही दिली, मग काय झाले माहीत नाही. कदाचित त्या महिलेची मागणी काही वेगळीच असावी जी पूर्ण होऊ शकली नाही, म्हणूनच ती नाराज आहे. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे केले जात असल्याची शक्यता आहे.
शंकर थकल्याचे वडील श्याम यांनी सांगितले. दोन दिवस तो झोपला नव्हता. फ्लाइटमध्ये त्याला ड्रिंक देण्यात आले, त्यानंतर तो झोपी गेला. त्याला जाग आल्यावर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी केली. माझा मुलगा सुसंस्कृत आहे आणि तो असे काही करू शकत नाही.दुसरीकडे पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी 10.30 वाजता आणखी एक समन्स बजावले आहे. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी फ्लाइट स्टाफला शुक्रवारी नोटीस बजावली होती, परंतु, फ्लाइट कर्मचारी आले नाहीत.
आरोपी वेल्स फॉर्गो कंपनीचा उपाध्यक्ष, कंपनीने काढले
आरोपीची ओळख मुंबईतील शंकर मिश्रा अशी आहे. वेल्स फॉर्गो कंपनीचा तो उपाध्यक्ष आहे. अमेरिकेतील मल्टिनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने शंकरला नोकरीवरून काढले. दिल्ली पोलिस शुक्रवारी मुंबईतील कुर्ला येथील आरोपीच्या घरी पोहोचले. येथे पोलिसांना आरोपी आणि त्याचे कुटुंब सापडले नाही. घरी काम करणारी मोलकरीण संगीता सापडली. त्यांनी सांगितले की, या घरात एका महिलेसोबत तीन मुले राहतात. घरातील सदस्यांचे नाव तिला माहीत नाही, पण आडनाव मिश्रा आहे.संगीता गेल्या वर्षभरापासून या घरात काम करत आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण कुटुंब या घरी होते. संगीता गुरुवारी रजेवर होत्या. शुक्रवार आला तेव्हा घर बंद असल्याचे दिसले. संगीताने सांगितले की, मिश्रा कुटुंबीयांनी ते कुठे जात आहेत हेही सांगितले नाही. या आधी प्रत्येक वेळी निघण्यापूर्वी कुटुंबीय सांगायचे, असे तिचे म्हणणे आहे.
354 total views, 6 views today