
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अमित देशमुखांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा (Congress Leader Amit Deshmukh to Join BJP) आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या चर्चेला अप्रत्यक्ष दुजोराही मिळालेला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविला आहे. भाजप कार्यकर्त्यांना ते आवडणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच निलंगेकरांनी दिला आहे. त्यामुळे देशमुखांचा भाजप प्रवेश सहजसोपा नाही, याची जाणीवही भाजप नेत्यांना असल्याचे सूत्रांनी सांगितले.अमित देशमुख हे भाजपमध्ये आल्यास काँग्रेसच्या दृष्टीने तो मोठा धक्का ठरू शकते. लातूरमध्ये आजही देशमुखांचा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून भाजप कामाला लागला आहे. प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये आणून लोकसभा निवडणुकीत राज्यातून सर्वाधिक खासदार पाठविण्याच्या लक्ष्यावर भाजप काम करीत आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश भाजपमध्ये होतील व अमित देशमुख हे त्यापैकी एक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निलंगेकरांचा विरोध?दरम्यान, अमित देशमुखांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची कुणकुण लागल्यावर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी विरोध दर्शवला आहे. अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेलेले नाहीत. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, भाजप कार्यकर्त्यांना बिलकुल रुचणार नाही, असे निलंगेकर म्हणाले आहेत.
पावभाजी आणि कडबोळी | Kadboli -secret reciepe, Pavbhaji Recipe |Shankhnaad Khaddya Yatra Ep.no. 71
500 total views, 3 views today