
सर्व 27 उमेदवारांचे नामांकन वैध नागपूर :विधानपिरषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची आज छाननी करण्यात आली. यावेळी सर्वच 27 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले असल्याने आता उमेदवारी अर्ज माघरीवरच सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. येत्या सोमवारी 16 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे तर 30 जानेवारीला मतदान होणार आहे
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी आणि निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे यांच्या उपस्थितीत अर्ज छाननी करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.
1,416 total views, 6 views today