
नागपूर: भाजपकडून भीती दाखवून इतरांची घरे तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र,ज्या दिवशी भाजपचे घर फुटेल तेव्हाच त्यांना कळेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिला.
विधानपरिषद निवडणुकीत टोकाचे राजकारण, नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नसणे या नामुष्कीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले याना छेडले असता ते म्हणाले, मी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आज पक्षश्रेष्ठीतर्फे जवळपास काही स्पष्ट निर्देश येतील, सत्यजित तांबेना आमचा पाठिंबा नाही याचा त्यांनी पुनरुचार केला.
काँग्रेस पक्षातर्फे सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. तांबे पिता पुत्रांनी ही फसवेगिरी केली आहे.
तांबे प्रकरणी हायकमांडकडून आज काही ठोस निर्णय येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा पाठिंबा बंडखोरांना कदापिही नाही.कॉंग्रेसची उमेदवारी सुधीर तांबे यांना होती.सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मागत आहेत, त्यांना काँग्रेस पाठींबा देऊ शकत नाही. दरम्यान,राज्यात आज एमपीएससी परीक्षेसाठी आंदोलन सुरू केले आहे, नव्या अभ्यासक्रम नुसार परीक्षा होतील, आज राज्यात गरिबांची मुले मुली, लाखो रुपये खर्चून परीक्षेची तयारी करीत आहेत. कुणावरही अन्याय होऊ नये,जर सरकार मानले नाही तर विधानसभेत आम्ही हा मुद्दा उचलून धरणार आहोत असा इशारा पटोले यांनी दिला.
401 total views, 3 views today