
नागपूर : मकर संक्रांती हा भारताचा एक मुख्य सण आहे. मकर संक्रांती विविध प्रांतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साधारणतः जानेवारी महिन्यात सरासरी 14 किंवा 15 जानेवारीला हा सण येतो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. सध्या बाजारात महिलांची काळी साडी,वाण, श्रुंगार साहित्य, लुटीचे साहित्य घेण्यासाठी तर पतंगबाजांची ओ …काट, ओ… पार अशी धूम यानिमित्ताने घराच्या गच्चीवर सुरू आहे.
तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी तिळगूळ देण्याची परंपरा आहे. एकविसाव्या शतकातही हळदीकुंकू ही परंपरा कायम आहे.
1,624 total views, 3 views today